कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित सुरेश जी. पाटील महाविद्यालय आणि कै. म. तु. पाटील महाविद्यालय मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी 1 ऑक्टोबर रोजी आयोजित झाल्या. एरंडोल विभाग क्रीडा समितीचे अध्यक्ष तथा मारवड महाविद्यालयाचे प्राचार्य वसंत देसले आणि सचिव देवदत्त पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. स्पर्धांचे उद्घाटन विद्यापीठाचे क्रीडा संचालक दिनेश पाटील आणि चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून झाले. यावेळी उपप्राचार्य केएन. सोनवणे, समन्वयक एसए वाघ यांच्यासह विविध महाविद्यालयांचे क्रीडा संचालक व मान्यवर उपस्थित होते.
समाचार
चोपडा महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा
4 अक्टूबर 2026 को 12:35 am बजे

चोपडा महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धा



