वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन
कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी उन्हात-पावसात रस्त्यावर बसून भाजीपाला व किरकोळ वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे शहरातील विविध भागांतील गरजू विक्रेत्यांना छत्र्यांचे मोफत वितरण करण्यात आले. विक्रेत्यांना छत्री वाटप प्रकल्पाचे प्रमुख रोटे. आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्लब सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, आझाद चौक, चिंच चौक, मेन रोड आणि मच्छी बाजार परिसरातील विक्रेत्यांना छत्र्या दिल्या. यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे अतिरिक्त सचिव नितीन अहिरराव, सहसचिव आशिष जयस्वाल, सदस्य चेतन टाटिया, गौरव महाले, विश्वास दलाल, वसंत नागपुरे, विपुल छाजेड तसेच क्लब अध्यक्ष संजय बारी उपस्थित होते.




