जळगाव येथे महोत्सवात तीन गटांमध्ये यश
जळगाव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान, चोपडा येथील भगिनी मंडळ आणि इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भुलाबाई महोत्सवात विवेकानंद विद्यालयाने तिहेरी यश संपादन केले. माध्यमिक गटात विवेकानंद विद्यालयाच्या इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थिनींच्या समूहाने द्वितीय क्रमांक पटकावला. या गटात त्यांना 700 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह मिळाले. त्याचप्रमाणे, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनीही माध्यमिक गटात तृतीय क्रमांक मिळवला. या यशामुळे त्यांना 500 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह प्राप्त झाले. या दोन्ही गटांतील विद्यार्थिनींना तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते, उपशिक्षिका कविता महाजन, नूतन चौधरी, मयुरी शहा आणि स्नेहल पाटील यांनी मार्गदर्शन केले.




