आरी मोड ते शिरूर अनंतपाळ या प्रमुख रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिरूर अनंतपाळ भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डोंगरगाव येथे माजी पालकमंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी रस्त्याच्या कामासह नाल्याच्या कामाचा मुद्दाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार निलंगेकर यांच्यासमोर मांडला.
समाचार
आरी मोड–शिरूर अनंतपाळ रस्त्याचा प्रश्न मार्गी आमदार निलंगेकरांचे आठवडाभरात काम सुरू करण्याचे आश्वासन
4 अक्टूबर 2026 को 12:35 am बजे

आरी मोड–शिरूर अनंतपाळ रस्त्याचा प्रश्न मार्गी आमदार निलंगेकरांचे आठवडाभरात काम सुरू करण्याचे आश्वासन
साझा करेंWhatsApp



