समाचार
Opening page
Preparing your workspace...
समाचार
शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलीटेक्निक), चोपडा येथे 24 व 25 सप्टेंबर रोजी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पालक सभा आयोजित करण्यात आली. पालक, विद्यार्थी आणि महाविद्यालय यांच्यातील सुसंवाद व समन्वय दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित ही सभा उत्साहात पार पडली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच व्यक्तिमत्त्व विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत महाविद्यालयाशी समन्वय ठेवण्याची भूमिका व्यक्त केली. सभेमध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणाऱ्या परिणामांवरही चर्चा करण्यात आली. या संदर्भात पालकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. एमएस. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. प्रथम वर्ष विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सभेला उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा. पीके चौधरी यांनी केले. या सभेमुळे विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालय यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्यास मदत झाली.
इस खबर पर आपकी प्रतिक्रिया