११२ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले
जळगाव रोटरी क्लब ऑफ जळगाव एलिटतर्फे मार्केट यार्डात रक्तदान शिबिर झाले. या शिबिराचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात ११२ पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले. या उपक्रमाला रेड क्रॉस सोसायटी आणि जळगाव मार्केट व्यापारी मंडळाचे सौजन्य लाभले. या शिबिर आणि क्लबच्या कार्याची माहिती क्लबचे अध्यक्ष संजय तापडिया आणि सचिव धर्मेंद्र भय्या यांनी दिली. या उपक्रमाचे कौतुक आणि रक्तदानाचे महत्त्व सभापती लक्ष्मण पाटील व मान्यवरांनी विशद केले. या वेळी क्लबचे माजी अध्यक्ष ओमप्रकाश सिंह, लक्ष्मीकांत मणियार, शशी बियाणी, डॉ.श्रीधर पाटील, राजीव बियाणी, नीलेश झवर, अमित बेहडे, पवन तापडिया, अरुण मणियार, आर्यन मणियार, गोविंद नागला, दिनेश राठी, आयुष मणियार, संदीप दहाड, नितीन बेहडे, पिंटू तापडिया, जगदीश वाणी, श्रीकांत सोले, सुनील शहा आदी उपस्थित होते.




