रात्री दीड वाजता महसूल विभागाची कारवाई
शिंदखेडा तालुक्यात आरावे गावाजवळ महसूल विभागाने अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई केली. शनिवारी 3 ऑक्टोबरच्या रात्री सुमारे दीड वाजता ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर व ट्रॉली तसेच सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली ही दोन वाहने अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करताना आढळून आली. ग्राम महसूल अधिकारी धनंजय महाजन, किशोर जगताप, संतोष कोरे, सागर गोमासे आणि महसूल सेवक विकास सैंदाणे, योगेश पवार, कल्पेश धनगर यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या आदेशाने आणि तहसीलदार शिंदखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी झाली.




